घोन्सी बु.येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील घोन्सी बु .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी मुख्याध्यापक श्री रामेश्वर हातकडके यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले….
या शाळेचे माजी मुख्याध्यापक रामेश्वर हातकडके यांचा मुलगा शुभम हातकडके याची वैद्यकीय अभ्यासक्रम(एम.बी.बी. एस )चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्याची भान ठेवून ज्या ज्या शाळेवर त्यांनी कार्य केलेले आहे अशा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प केला होता त्या अनुषंगाने आज घोन्सी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवी पर्यंत 230 विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच श्रीराम बेरगळ माजी सरपंच तुकाराम माने,लक्ष्मण ढेरे, लोकमतचे पत्रकार दिगंबर गुजर, मुख्याध्यापक विक्रम कोळेकर सहशिक्षक सावंत सर,श्रीरंग भोसले, सुनील माने,सतीश कदम,आयुब शेख, श्रीमती सोनाली पवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विक्रम कोळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीरंग भोसले यांनी करून शेवटी सतीश कदम यांनी आभार व्यक्त केले..