परतूर तालुका

पत्रकार भारत सवने पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ मुंबई, कार्यक्षेत्र ऑल इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा पत्रकार भूषण पुरस्कार परतूर येथील पत्रकार भारत सवने यांना पत्रकार भूषण पुरस्काराने मुंबई ठाणे येथे पत्रकारांच्या एक दिवासीय अधिवेशनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  कैलास देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मुनीर खान, उद्योजक चंद्रकुमार जाजोदीया, प्रदेश सरचिटणीस रवींद्र मेंढे, धनंजय सिंह, बाळासाहेब सोरगीवकर, आळंदी येथील रामायणाऱ्या हभप साध्वी सरस्वती वैष्णवी दीदि, अँड संदीप लेले, माहिती जनसंपर्क माजी संचालक देवेंद्र भुजबळ, दैनिक प्रहारचे संपादक सुक्रत खांडेकर, जेष्ठ कवी लेखक विलास खानोलकर, यांच्यासह अनेक मान्यवर यांच्या हस्ते दिमाखदार पुरस्कार  वितरण सोहळा पार पडला. यावेळी पत्रकार भारत सवने यांना पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!