घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता !

कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी कुलदीप पवार

images (60)
images (60)

सरस्वती भुवन प्रशालेचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनोखा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी कार्यक्रमांनी साजरा होत आहे.देशाच्या स्वातंत्र्याला अमृत महोत्सवापर्यंत पोहोचवण्याचं खरं श्रेय देशभक्तांना, स्वातंत्र्य सैनिकांना दिला जातो.याची जाणीव ठेवून संपूर्ण देशवासीयांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले पाहिजे.त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हा हेतू समोर ठेवून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील  सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांच्यासह शिक्षक महेश बहाळकर,सुधाकर येवतीकर या शिक्षकांनी कुंभार पिंपळगाव येथील स्वातंत्र्य सैनिक कै.श्रीकृष्णजी राठी यांचे सुपुत्र जयप्रकाश राठी आणि नातू किशोर राठी , किरण राठी,पवन राठी या संपूर्ण राठी कुंटुंबियांची संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्णजी राठी यांच्या कार्याला वंदन केले .
स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण राठी यांचे सुपुत्र  जयप्रकाश राठी यांनी आपल्या वडिलांच्या कार्याला संतोष सवडे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान उजाळा दिला.स्वातंञ्य सैनिक श्रीकृष्ण राठी यांनी केलेल्या कार्याचे फळ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे सन १९८६ मध्ये सन्मानपत्र देऊन तसेच केंद्र शासनातर्फे ताम्रपट देऊन गौरव करण्यात आल्याचे जयप्रकाश राठी यांनी यावेळी सांगितले.स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही स्वातंत्र्यसैनिक कै.श्रीकृष्ण राठी यांनी आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते.असे सांगून वर्तमान काळामध्ये तरुणांमध्ये देशभक्ती रुजविण्याची गरज आहे.आणि ती गरज पूर्ण करण्याचे काम स .भु .प्रशाले सारख्या शाळा करताना दिसत आहेत.याचा मनोमन आनंद होत आहे. अशा प्रकारच्या भावना व्यक्त  करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राठी कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. व स.भु.प्रशालेचे आभार मानले .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!