परतूर तालुका

परतूर शहरात ‘छत्रपती महाराजा अग्रसेन चौक’ सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न..

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

शिवसेना उपनेते माजी मंत्रीअर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून परतूर शहरात ‘छत्रपती महाराजा अग्रसेन चौक’ सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन परतूर शहरातील अग्रवाल समाजाचे राधेश्यामजी मोर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.परतूर शहरातील वाटुर-परतुर रोडवरील डॉ. अंभोरे यांच्या दवाखान्यासमोरील चौकास छत्रपती महाराजा अग्रसेन चौक असे नामकरण नियमानुसार परतूर नगरपालिकेच्या वतीने ठराव करून करण्यात आले होते. त्यानंतर जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी या चौकाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून विशेष निधीद्वारे निधी मंजूर करून आणला सदरील चौकामध्ये मोठे हायमास्ट लाईट बसविण्यात आले असून महाराजा अग्रसेन चौक सुशोभीकरण करण्यात येणार असून अग्रवाल समाजाचे प्रतीक असलेले स्तंभ एक वीट ,एक रुपया , छत्री व भगवा ध्वज अशा प्रकारचे चौकाची सजावट करण्यात येणार असून येणाऱ्या महाराजा अग्रसेन जयंतीच्या पूर्वी सदरील चौकाचे काम पूर्ण करण्यात येईल असे मोहन अग्रवाल यांनी सांगितले या उद्घाटन प्रसंगी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष गोविंद मोर, उपाध्यक्ष आनंद बगडिया, सचिव सौरभ बगडिया, अमोल अग्रवाल, सुनील मोर, कृष्णा अग्रवाल, निलेश बगडिया, रितेश अग्रवाल, अमर बगडिया, आतिश मोर, अरविंद मोर ,शांतीलाल अग्रवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. परतूर शहरात मोहन अग्रवाल यांनी सदरील चौकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अग्रवाल समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!