रेणुका माध्यमिक विद्यालयात डॉ.लक्ष्मण दशरथराव बोराडे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथील रेणुका माध्यमिक विद्यालयात बुधवार (ता.१७) रोजी डॉ. लक्ष्मण दशरथराव बोराडे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर्दड आर.आय.हे होते.तर,प्रमुख पाहुणे म्हणुन लष्कर व्ही. डी. यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ.लक्ष्मणराव दशरथराव बोराडे यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी यांचे मनोगत घेण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी डॉ.लक्ष्मणराव दशरथराव बोराडे यांचे जीवन व कार्य या विषयी अमुल्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुञसंचलन शिक्षक संदिप पवार यांनी केले.तर आभारप्रदर्शन सरोदे के.ई.यांनी मानले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.