येणोरा येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
तालुक्यातील मौजे येणोरा येथील युवकांचा मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (शिंदे गट) आज प्रवेश केला .या मध्ये गोविंद भुंबर, अनिल जाधव, अनिल घोडे, गजानन गायकवाड, गणेश साळवे , व राम धोत्रे यांनी जाहीर प्रवेश केला. येणारा येथील युवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकास कामे पाहता व माझ्या नेतृत्वावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व त्यांना योग्य न्याय देण्याचे काम करू तसेच बाळासाहेब ठाकरे ,आनंद दिघे साहेबांचे विचार आणि शासनाने केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी या जाहीर प्रवेशा वेळी सांगीतले. यावेळी शिवसेनाचे अमोल सुरूंग, दत्ता अंभूरे, दीपक हिवाळे, सतीश हजारे, साहेबराव पवार व आदी शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.