पोळा सनावर विरजण:आंबा येथे 6 गाईंचा मृत्यू, विजेचा शॉक लागल्याने घडला अनर्थ.

बैलपोळ्याच्या उत्साहावर पडले विरजण
परतूर ता.26(प्रतिनिधी ) तालुक्यातील आबा येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो मात्र यावर्षी बैल मिरवायच्या वेळेलाच अचानकपणे काळाने घाला घालत विजेचा शॉक लागून सहा गाईंचा मृत्यू झाल्याने पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून गावातील मोकाट गाई अचानकपणे मृत झाल्यामुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत.
शुक्रवारी (ता.२६)
रोजी शेतामध्ये रानडुक्कर येऊ नयेत यासाठी लावलेल्या कुंपणा शेजारी या गाई गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना गावात घडल्यामुळे गावावर शोक काळा पसरली असून गावातील बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. पारंपरिक पद्धतीने या गावांमध्ये नियमितपणे वेगळ्या उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो या ठिकाणची कृषक आपल्या बैलांना सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढत असतात या गावातील पोळ्याला एक वेगळी महत्त्व असून मारुतीचे मंदिर नसणारे हे परतुर तालुक्यातील एकमेव गाव आहे या गावांमध्ये बागेश्वरी मातेचे दर्शन करून पोळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले.
यासंदर्भामध्ये गावकऱ्यांशी चर्चा केली असता यावर्षीचा पोळा आनंदात साजरा करण्याच्या आम्ही ठरवले होते परंतु काळाने घाला घालत अचानकपणे सहा गोमातेचा मृत्यू झाल्यामुळे आमचं संपूर्ण गाव दुःखाच्या सागरात बुडालेली असल्याच यावेळी दिसून आले आहे.
रात्री आठ च्या सुमारास पोलीस बंदोबस्ता मध्ये मूत गाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्यामसुंदर कौठाळे, पोलीस निरीक्षक ,परतूर
विजेच्या शोक लागल्याने या गाईचा मृत्यू झाला आहे.यात चार गाई दोन बैल याच्यावर रात्री साडेआठ च्या सुमारास या गाईवर बागेश्वरी मंदिराच्या पाठिमागे अंत्यसंस्कार करण्यात आले.दोषींवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी राजू मोरे,पोलिस निरीक्षक श्यामसूंदर कौठाळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टेवार, गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,कर्मचारी गजानन राठोड, आदींनी भेट दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.गावात दुःखाचा डोंगर कोसळल्याने पोळा सणाच्या दिवशी गावकऱ्यांनी जेवण केले नाही.
सोशल मीडियावर भावनिक पोष्ट
तालुक्या सह जिल्हात या घटनेचे माहिती वाऱ्या सारखी पसरली अनेकांनी भावनिक पोष्ट केल्या.