पोलिसांनी तपासाची गती अधिक वाढवावी-आ.अंबादास दानवे
समर्थ रामदास स्वामी यांचे देशभरात अलौकिक कार्य-आ.राजेश टोपे
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील मुर्ती अज्ञात चोरट्यांनी (दि.२१) रोजी चोरून नेल्या आहेत.या ठिकाणी विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे व माजीमंत्री आमदार राजेश टोपे यांनी रविवार (दि.२८) रोजी भेट दिली.
यावेळी पुढे बोलताना आ. दानवे म्हणाले की,मुर्ती चोरीच्या घटनेचा पडसाद पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी उमटले असून या घटनेला आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे.परंतु अद्यापही पोलिसांना घटनेचा उलगडा झालेला नाही.सध्या सुरू असलेल्या तपास यंत्रणेवर मी समाधानी नसल्याचे आ.दानवे यांनी यावेळी सांगितले.याबाबत लवकरच पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची भेट घेवून उच्चस्तरीय समितीची नेमणूक करून तपासाची गती अधिक वाढविण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.तसेच आमदार राजेश टोपे म्हणाले की,समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य अलौकिक असल्याचे यावेळी म्हणाले.यावेळी रामदास स्वामी यांचे वंशज भूषण महारूद्र स्वामी, पुजारी धनंजय देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,उपनिरीक्षक मरळ, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, हिकमत उढाण,शिवाजी चोथे,भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे,उद्धव मरकड,अंशिराम कंटुले,देवनाथ जाधव,महादेव काळे,अनिरूद्ध शिंदे,संदिप कंटुले, मतीन शेख,बाळासाहेब तांगडे,प्रकाश आण्णा तांगडे, विलास तांगडे,राजेंद्र तांगडे,शाम तांगडे, सुशील तांगडे, नारायण तांगडे, सुरेश तांगडे यांच्यासह आदी उपस्थित होते.