घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
जांबसमर्थ मुर्ती चोरी प्रकरण
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या सहा मुर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.या चोरीच्या घटनेला आठवडाचा कालावधी उलटला मात्र अद्यापही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.या घटनेचा तपास अधिक वेगाने वाढवून आरोंपीना तत्काळ अटक करावेत या मागण्यांसाठी व घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना व व्यापारी महासंघ यांच्या वतीने सोमवार (ता.२९) रोजी कुंभार पिंपळगाव बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला उत्सूर्फ पाठिंबा दर्शविला.गावातील अंबड -पाथरी टी पॉईंट मुख्य रस्त्यासह चौकातही शुकशुकाट वातावरण पाहायला मिळाला.नेहमीच वाहनांच्या वर्दळांनी गजबजलेला हा रस्ता निर्मनुष्य दिसून आला.