वडारवाडीत विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर साठी दीपक हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले अमरण उपोषण लेखी अश्वसनानंतर अखेर मागे
परतूर / प्रतिनिधी
येथील वडारवाडीत विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर बाबत पाठपुरावा व मंजुरी दिल्यानंतर ही महावितरण कडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मोहन अग्रवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शांखाली व दीपक हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली वडार वाडीतील नागरिकांनी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले होते. याबाबत येत्या आठ दिवसात सदरील कामाला सुरुवात करणार असे लेखी अश्वासन सहाय्यक अभियंता महावितरण भेंडाळे यांनी दिल्यावर मोहन अग्रवाल यांच्या माध्यस्तीने सदरील उपोषण सोडण्यात आले. या विभागात विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर या समस्येमुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यापूर्वी शिवसेनेच्या आवाज उचलला होता, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे याठिकाणी तब्बल चाळीस पोल व डीपी चे काम मंजूर झाले ते अद्याप चालू न झाल्यामुळे नागरिकांनी आमरण उपोषण पुकारले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तांत्रिक अडचण लक्षात देता येत्या आठ दिवसात सदरील काम चालू करणार या लेखी आश्वासनावर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. यामुळे वडारवाडी वासियांनी शिवसेनेचे ( शिंदे गट ) मोहन अग्रवाल, दीपक हिवाळे यांचे आभार मानले.