जालना क्राईममंठा तालुका

Mantha :मंठा येथील विजवतरण कार्यालयाची तोडफोड

 मंठा: येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयाची दि १ सप्टेंबर दुपारीतोडफोड करण्यात आली, वारंवार सूचना देऊन फोन करून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्ते शेषनारायण दवणे यांनी ही तोडफोड केली. याविषयी सविस्तर वृत्त असे की दोन वर्षाच्या प्रतीक्षे नंतर या वर्षी मोठया उत्सहात गणेशोत्सव साजरा होत आहे अश्या या उत्सहात मंठा येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

images (60)
images (60)

या संदर्भात कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार सूचना, फोन करूनही कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता याचा परिणाम गणेशोत्सवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमावर होत असल्याने भावना अनावर होऊन कार्यालय फोडावं लागल्याच दवणे यांनी सांगितले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!