जालना जिल्हा

जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मूर्ती चोरीचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे सोपवा – आ. गोरंटयाल

जालना(प्रतिनीधी) – घनसावंगी तालुक्यातील स्वामी रामदास यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून ऐतिहासिक व पुरातन असलेल्या मुर्त्यां चोरीचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावा अशी आग्रही मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.कैलास गोरंट्याल यांनी आज येथे बोलताना केली.

images (60)
images (60)

समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून चोरीस गेलेल्या पुरातन मुर्त्यांच्या चोरीचा तपास लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला महिनाभराचा कालावधी उलटूनही यश आले नाही.श्री विसर्जनापर्यंत चोरीस गेलेल्या पुरातन मुर्त्यांचा तपास लागला नाही तर जालन्यात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.कैलास गोरंटयाल यांनी जांबसमर्थ येथे दिलेल्या भेटीनंतर दिला होता. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी आ.कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर एका शिष्टंडळाने जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.यानंतर उपस्थीत पत्रकारांशी संवाद साधताना आ. गोरंटयाल म्हणाले की, जांब समर्थ येथील मंदिरातून चोरीस गेलेल्या पुरातन मुर्त्यांचा तपास लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे.हा मुर्त्या चोरीचा विषय महाराष्ट्र राज्यासह देशातील लाखो भक्तांच्या भावनेचा असून या चोरीचा तपास  लावण्यात आलेले अपयश लक्षात घेऊन सदर तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवून चोरीस गेलेल्या पुरातन मुर्त्यांचा तातडीने छडा लावण्यात यावा अशी आग्रही मागणी आ. गोरंटयाल यांनी यावेळी केली.जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांना लिंपी आजाराने ग्रासले आहे.यामुळे पशू पालकांसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात हतबल झाले असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तसेच जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लिंपी आजारामुळे ज्यांची ज्यांची जनावर दगावली असतील अशा पशुपालकांसह शेतकरी बांधवांना तातडीने रोख आर्थिक मदत करावी आणि गावागावात, वाडी,वस्त्यांवर पशू संवर्धन विभागाच्या पथकाद्वारे निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम व्यापक स्वरूपात हाती घेण्यात यावी अशी मागणी देखील आ. गोरंटयाल यांनी यावेळी केली.दरम्यान,ठिय्या आंदोलन स्थळी माजी नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल,युवानेते अक्षय गोरंटयाल,सौ. सुषमाताई पायगव्हाणे,अब्दुल रउफ परसुवाले आदींनी मनोगत व्यक्त करताना जांबसमर्थ येथील पुरातन मुर्त्या चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची मागणी केली. या आंदोलनात ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबुराव सतकर,राम सावंत, विजय चौधरी,महावीर ढक्का,राधेश्याम जयस्वाल,वसंत जाधव, शितलताई तनपुरे, विलास तांगडे,युवराज आर्दड,माजी गटनेते गणेश राऊत,मंगलताई खांडेभराड,रमेश गौरक्षक,वाजेद पठाण,विनोद यादव,नारायण शिंदे, श्रावण भुरेवाल,सय्यद अझहर,राज स्वामी,संजय भगत,जगदीश भरतीया,जीवन सले, राहुल हिवराळे,विनोद रत्नपारखे,अशोक भगत,राजेंद्र वाघमारे, आरेफ खान,अरुण मगरे,धर्मा खिल्लारे,शेख शकील,विष्णू वाघमारे,संगीता पाजगे,किशोर गरदास, चंद्रशेखर कोताकोंडा,नटराज चौधरी,अमजद पठाण,नजीब लोहार,संतोष काबलीये,फकिरा वाघ,गणेश चौधरी,दत्ता पाटील घुले,नंदाताई पवार,गणेश चांदोडे,संजय पाखरे,विधीज्ञ सोपान शेजुळ,दिलीप मोरे,बद्रीनाथ जाधव,राजू महाडिक,गणेश खरात,किरण खरात,समाधान शेजूळ,मनोहर उघडे,अंजेभाऊ चव्हाण,माणिक राठोड,युवराज राठोड,नानाभाऊ सुरवसे,नारायण डोंगरे,विष्णू गायकवाड,राम शेजूळ,बालाजी शिरसाठ,संतोष देवडे, ज्ञानदेव डुकरे यांच्यासह जालना शहर व मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात मिळणार भरपाई

जालना विधानसभा मतदार संघातील ज्या ज्या भागात अतिवृष्टी होऊन शेजाऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.ज्यांचे पंचनामे करण्यात आले अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या आज मंगळवारी दुपारी झालेल्या चर्चेच्या वेळी निदर्शनास आणून दिले.शिवाय ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले मात्र अद्याप पंचनामे करण्यात आले नाही अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी देखील आ. गोरंटयाल यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत आर्थिक मदत करण्यात येईल तसेच राहिलेले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून संबधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील तात्काळ भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी दिली असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

…. तर जांबसमर्थला भेट द्या,शिंदे,फडणवीसांना आ. गोरंटयाल यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा खरा विचार घेऊन आम्ही सत्तेत आलो असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात आणि प्रत्येक भाषणात त्याचा उल्लेख देखील करतात याच मुद्याला धरुन आ.कैलास गोरंटयाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,तुम्ही जर खरच बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असताल तर आपण जांबसमर्थ येथे भेट द्या,कारण ही ऐतिहासिक भूमी आहे, संत रामदासांची जन्मभूमी असून याबाबत आपण गांभीर्याने दखल घेऊन भक्तांना न्याय द्यावा असे साकडे देखील आ. कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!