घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शंकरराव पाटील तौर शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुसंवाद भेट कार्यक्रम संपन्न

कुलदीप पवार/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जालना व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय घनसावंगी यांच्या वतीने केंद्र कुंभार पिंपळगाव व गुंज केंद्रातील एकूण २६ शाळांची सुसंवाद भेट गुरूवार (ता.१५) रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी एकूण १३ टीम मधील २६ पर्यवेक्षीय यंत्रणेने सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत या कालावधीत प्रत्यक्ष शाळेवर जाऊन विद्यार्थी व शिक्षकांशी सुसंवाद साधून शैक्षणिक प्रगती कशी वाढवता येईल या दृष्टीने मार्गदर्शन व निरीक्षण नोंदविले.
यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता संजय येवते,प्राध्यापक जालिंदर बटुळे,घनसावंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी,सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी विनोद कऱ्हाडे, मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके,रामेश्वर आर्दड,प्रदीप चव्हाण,विनायक कदम यांची उपस्थिती होती.घनसावंगी तालुक्यातील १२ केंद्रातील केंद्रप्रमुख त्याचप्रमाणे भारत साधन व्यक्ती यांच्या माध्यमातून सुसंवाद भेट कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये शाळा स्तरावर विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी कोण-कोणते उपक्रम राबविले जातात.विद्यार्थी अध्ययन स्तरावर कोणत्या स्थितीमध्ये आहे,त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार,विविध स्पर्धा परीक्षा,विज्ञान प्रयोगशाळा,ग्रंथालय,दुर्बीण अध्यापनात वापरले जाणारे दीक्षा ॲप,रीड टू मी यासारखे माध्यमे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही ?किंवा त्यात काय अडचणी येतात.यावर उपाययोजना कशाप्रकारे करता येतील याविषयी सर्व शिक्षकांना शाळेवर मार्गदर्शन करण्यात आले.दरम्यान,प्रत्येक शाळेवर प्रत्येक वर्गाचे वर्ग अध्यापन कसे केले जाते याचे निरीक्षण या पर्यवेक्षीय यंत्रणेने नोंदविले.दुपारी सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ कुंभार पिंपळगाव संचलित,शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा कुंभार पिंपळगाव येथे शाळेत एकूण ११६ शिक्षकांची एकत्रित मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्व पर्यवेक्षणीय यंत्रणेने आपली मते या ठिकाणी व्यक्त केली.व शाळा स्तरावर चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये थोड्याफार प्रमाणात उणीवा जाणवल्या त्यांना त्या उणीवा कशा दूर केल्या जातील या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक जालिंदर बटुळे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी यांनी मोलाचे अमूल्य मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता कशाप्रकारे वाढवली जाईल त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात यांचे सविस्तर मार्गदर्शन संजय येवते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जालना यांनी केले.सदर उपक्रमासाठी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व त्यांचा सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खोडदे यांनी केले.तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी माधव हरदास यांनी मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!