परतूर तालुका

ओला दुष्काळ,पीकविम्याच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकर्‍यांचा बैलगाडी मोर्चा

images (60)
images (60)

अतिवृष्टीनी सुकलेली कपाशीची झाडे घेऊन शेतकर्‍यांनी मांडली व्यथा

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

ई-पीक पाहणी रद्द करावी,अतिवृष्टीत बाधित पिकांचा विमा तात्काळ द्यावा या व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर असंख्य शेतकर्‍यासह अतिवृष्टीने सुकलेली पीके हातात घेत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शासनाने शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून शेतातील पिकाच्या नुकसानीचे तपशील पाठवावेत असे सांगितले आहे.परंतु तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने ई पीक पाहणी करताना अनेक अडचणी येत आहेत.मोबाईल नसल्याने अनेक शेतकरी ई पीक पाहणी करू शकले नाहीत.त्यामुळे या शेतकऱ्यांचा विचार करून या हंगामासाठी ई पीक पाहणी रद्द करण्यात यावी.
ऊस पिकाचा पीक विम्यात समावेश करावा,
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी.
राज्यातील अनेक जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात शासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत केली आहे.मात्र परतूर व मंठा तालुक्यात नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.
तालुक्यातील काही गावांमध्ये सोयाबीन पिकांवर पिवळा मोझेक हा रोग पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही त्यांना तात्काळ पीककर्ज देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी विक्रम धुमाळ,दत्ता सुरूंग, रामचंद्र काळे, दिगंबर सोळंके, माधवराव कदम,प्रभाकरराव धुमाळ,शाहीर खालापुरे, लक्ष्मीकांत कवडी, सुदर्शन सोळंके, महेश नळगे,सचीन खरात, बाबा गाडगे, रमेशराव सोळंके, कृष्णा सोळुंके, मधुकर झरेकर ,भारत पंडीत,संदीप पाचारे,विष्णू मुजमुले, बाबुराव हिवाळे,अशोकराव आघाव, आप्पा वटाणे, मधुकर पाईकराव, गजानन अंभोरे, रामचंद्र काळे, गजानन धुमाळ, राहुल,कदम,इब्राहिम कायमखानी, भैया कवडी ,अंबा कदम, गजानन चवडे, विकास खरात, गणेश नळगे, प्रवीण अंभोरे ,ओंकार काटे, इंद्रजीत घनवट, आसाराम देवकर,एकनाथ कदम,राजेभाऊ धुमाळ,भागवत भुंबर, रामेश्वर धुमाळ आदी मोर्चात सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!