कोठाळा बु.येथील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

न्यूज जालना/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यातील कोठाळा बु.येथील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात,नसता येत्या आठ दिवसात उपोषण करण्यात येईल, असा इशारा युवा क्रांती एकता संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आला आहे.या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना मंगळवार (ता.२०) रोजी देण्यात आले.
कोठाळा बु.येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे.या शाळेत एकूण २२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रशालेत सध्या पाच शिक्षक कार्यरत आहे.एका शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदांचा कारभार असून चार शिक्षकांवर इतर भार पडत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत रिक्त पदे भरावी अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे.या निवेदनावर दिपक साबळे,योगेश साबळे,युवा क्रांती एकता संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अनिल चव्हाण, यांच्या स्वाक्षऱ्या आहे