घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
यावलपिंपरी तांडा येथे जनावरांना मोफत लंम्पी प्रतिबंधक लसीकरण
कुलदीप पवार/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी तांडा येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंती निमित्त व युवानेते संजय पुंडलिक राठोड यांच्या पुढाकाराने लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मारूती मंदिरासमोर येथील ३०० जनावरांना बुधवार (२१) रोजी मोफत लंम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
मनिषाताई टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली.यावेळी डॉ.अमोल पवार यांनी परीश्रम घेऊन सर्व जनावरांचे लसीकरण केले.यावेळी नारायण राठोड, शंकर,राठोड,हिंमतराव पवार, प्रकाश राठोड, विष्णू राठोड, विलास राठोड, संदीप राठोड, नितीन राठोड, संकेत राठोड, सतिष राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती लावली.