परतूर तालुका

वरफळकरांच्या आंदोलनाने विजवीतरण कार्यालय दणाणले…..


उपकार्यकारी अभियंता यांच्या अश्वासनाने आंदोलन मागे

images (60)
images (60)

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनी च्या निष्काळजीपणा मुळे झालेला असल्याच्या अनेक तक्रारी तालुक्यात असतांना मौजे वरफळ येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र वेळोवेळी जळत आहे याबाबत गावकऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या निदर्शनास आणून दिले असता विद्युत विभागाकडून अत्यंत खराब दर्ज्याचे रोहित्र दुरुस्त करून आणून दिलेले असल्याचा आरोप करत नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला
याबाबत गावकरी यांचे म्हणणे आहे की मागील अनेक वर्षापासून विजेच्या समस्या बाबत कायमचा तोडगा निघत नसल्याने स्थानिक गावकरी लोकवर्गणी जमा करून गावातील जळालेले रोहित दुरुस्त करून आणतात व रोहितरावर झालेल्या बिघाडा चा खर्च सुद्धा गावकरी आपल्या माध्यमातून करतात परंतु जळालेले रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत खराब दर्जाचे व त्यातील आई हे पूर्णतः काळे असतात त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महिना महिना दोन दोन महिने घरगुती वीज पुरवठा मिळत नाही तरीही विद्युत वितरण विभागाकडून विजेचे बिल देण्यात येतात यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता निलेश भेंडाळे यांचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केलं जवळपास हे आंदोलन दोन तास चाललं त्यानंतर श्री निलेश भेंडाळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून अविश्वासीत केले की येणाऱ्या 1 तारखे पर्यंत गावातील विजेच्या पूर्ण समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे तर तत्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!