घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
तलवार जवळ बाळगल्या प्रकरणी एका जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
न्यूज जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला बु.येथील एकास तलवार जवळ बाळगणे चांगलेच महागात पडले असून त्यांच्याकडे बेकायदेशीर रित्या एक लोखंडी पाते असलेली जर्मनची मूठ असलेली ५३ इंच लांबी व साडेचार इंच पाते असलेली तलवार कब्जात व ताब्यात बाळगताना आढळून आला आहे.भाऊसाहेब पंडीतराव जाधव वय (२९) असे तलवार बाळगणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोहेकॉ किसन घुणावत यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ हे करीत आहेत.