परतूर तालुका

७५ व्या वर्षानंतर मुक्त सुविधा देण्यापेक्षा विध्यार्थ्यांना बस प्रवास मोफत करणे गरजेचे होते – भास्करराव पेरे

परतुर मतदार संघातील पाच साहित्यिकांना बी रघुनाथ पुरस्कार प्रदान

images (60)
images (60)

दीपक हीवाळे / परतूर न्युज नेटवर्क

राज्य शाषनाने अलीकडे 75 वर्षाच्या पुढील व्यक्तीला बस मोफत अशी घोषणा केली, मात्र वयाच्या 75 वी ओलाडल्यावर कोण प्रवास करणार त्यापेक्षा ही सुविधा शाळेत दूर दूर वरून शहराकडे शिक्षण घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या विध्यार्थी विध्यार्थीनींना दिली तर शिक्षणाचा चळवळीला वेग प्राप्त होईल असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते भास्करराव पेरे यांनी केले येथील इंद्रा मंगल कार्यालयात पतंजली आयुर्वेदचे डॉ दीपक दिरंगे यांच्या वतीने व प्राचार्य डॉ भगवान दिरंगे यांच्या पुढाकाराने आयोजित बी रघुनाथ साहित्य पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भारत खंदारे तर पुरस्कार विजेते डॉ छबुराव भांडवलकर, प्रा.डॉ अशोक पाठक, प्रा डॉ सदाशिव कमळकर, धोंडोपंत मानवतकर, अजय देसाई यांची प्रमुख उपस्तीती होती. यावेळी आपल्या मुख्य मार्गदर्शनात पेरे पाटील पुढे म्हणाले की, समाजव्यवसतेला बदलायचे असेल तर अगरोदर आपल्या स्वतः पासून सुरवात करा. नेते चुकीचे नाहीत मात्र आपल्या गावाचा विकास करायचा तर हक्का साठी पेटून उढण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. माझ्या पाटोदा गावाच्या विकास करताना तब्बल 25 वर्ष नेतृत्वाची पकड मी मजबूत ठेवली, विकास दूरदृष्टीचा पाहिला, नागरिकांच्या मूलभूत गरजांचा अभ्यास केला, म्हणून आज माझ्या ग्राम पंचायती मार्फत गावात, फिल्टर पाणी, धुण्याचे पाणी, गरम पाणी, मोफत गिरणी, गावात मुक्त वॉयफाय सुविधा, विविध फळांची झाडी, यासह अनेक सुविधा नागरिकाना पुरवल्या जात असल्याची त्यांनी यावेळी सखोल माहिती दिली, यासाठी गावातील नागरिक नियमित टॅक्स भरत ग्रामपंचायतीला सहकार्य करतात, राष्ट्रपती पदकाने दोन वेळेला तर अनेक महवाच्या पुरस्काराने माझ्या गावाला सन्मानित केले असल्याची त्यांनी माहिती दिली. नागरिकांनी प्रथम आपल्या गावाच्या ग्राम पंचायत, पालिकेचा नियमित टॅक्स भरावा तरच नंतर आपल्या सुविधे बाबत व विकासाबाबत संथीताना जाब विचारण्याचा आपल्याला नैतिक अधिकार राहील. असे म्हणत त्यांनी उपस्तीत विद्यार्थ्याना आपल्या मनोगतातून प्रगतीचे धडे दिले. यावेळी छबुराव भांडवलकर, प्रा.डॉ अशोक पाठक, प्रा डॉ सदाशिव कमळकर, धोंडोपंत मानवतकर, अजय देसाई यांना बी रघुनाथ पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समूर्तीचिन्ह, प्रशस्त पत्र तसेच शाल श्रीफळ देत सन्मानित करण्यात आले. आपल्या सन्माला उत्तर देताना सत्कार मूर्तींनी आयोजकांचे आभार मानत उपस्तीताना आपले साहित्य सादर केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ दीपक दिरंगे यांनी परतूर कार्यक्षत्रातून अवघ्या जगात नाव लवकीक करणारे बी रघुनाथ हे आपल्या मातीलले असून त्यांचा तरुण पिढीला विसर पडू नये व साहित्य चळवळीला वेग मिळावा या हेतूने या पुरस्काराची सुरवात केली असल्याचे सांगत पुढच्या वेळी याला मोठे स्वरूप प्राप्त करू आशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा शरद बोराडे तर आभार पत्रकार बालाजी ढोबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला विध्यार्थी, विध्यार्थीनी, परिसरातील डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, प्रतिषीत नागरिकांची व साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!