परतूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी लक्ष्मणराव पवार तर व्हाईस चेअरमन पदी बाबुराव काटे यांची बिनविरोध निवड…

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
परतुर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत चेअरमन पदी लक्ष्मणराव पवार तर व्हाईस चेअरमनपदी बाबुराव काटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . संचालक प्रमोद जगताप, श्रीधरराव डोंगरे, मंगेश आढाव,लक्ष्मीकांत कवडी,लिंबाजी जगताप,प्रभाकर बागल,दत्तात्रय भापकर, अंजलीदेवी कल्याणराव बागल,शिवाजी पाडेवार,गंगाधर माने वअनुसयाबाई नवल आदींची संचालक पदी निवड झालेली आहे. सर्व विजयी उमेदवाराचे पुष्पहार घालून गावकऱ्यांनि सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बिनविरोध निवडीबद्दल विशेष सहकार्य गंगाधर बापू पवार, अनंतराव बागल पाटील यांनी केले .यावेळी या निवडीचे कामकाज निर्वाचन अधिकारी म्हणून सुनील बारगजे सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परतूर यांनी कामकाज पाहिले.तर संस्थेचे सचिव हनुमंत जोशी यांनी कामकाज पाहिले