राहूल भैय्या लोणीकर यांची युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदी निवड…
पाटोद्यात जल्लोष
परतुर प्रतिनिधी: परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथे भारतीय जनता पार्टी चे युवा कार्यकर्ते मा.श्री.राहुल भैय्या लोणीकर यांची युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे पाटोद्यात जल्लोष साजरा करण्यात आला.
या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला.
या वेळी लक्ष्मणराव शिंदे , संभाजी खवल , भिमराव शिंदे , सुरेश पाटोदकर , चत्रभुज खवल सर , उद्धव खवल सर, शंकर खरात , संभाजी शिंदे , सुरेश शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
परतुर तालुक्याला प्रदेशाध्यक्ष पद मिळाले असल्याने युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात आनंद निर्माण झाला आहे.पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे राहुल भैय्या पार पाडतील असा विश्वास असल्याचे चत्रभुज खवल यांनी सांगितले.तरुणाना एकत्रित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.ज्या ज्या वेळी पक्षाने मोठी जबाबदारी दिली त्या त्या वेळेस ती त्यांनी लिलया पेलली आहे.
अगदी कोरोना च्या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आधार देण्याचे काम केले आहे.
मा.राहुल भैय्या लोणीकर यांच्या वर पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.
पुढील वाटचालीस मा.राहुल भैय्या लोणीकर यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचे मनापासून अभिनंदन…..