परतुर पोलीसांची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण ? पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल नाटकर
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतुर रेल्वे स्टेशन परिसरात वाढदिवस साजरा करीत असताना परतुर पोलिसांनी वाढदिवसाच्या केक फेकून दिला व जमलेल्या युवकांना दमदाटी करुन वाढदिवस साजरा करणा-यांना दम देउन त्या ठिकाणावरुन हाकलून लावले या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्षाने जालना पोलीस अधिक्षकांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणीची तक्रार केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल नाटकरसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासह शनिवारी ता. १५/१०/२०२२ रोजी संध्याकाळी ७:३० दरम्यान परतुर रेल्वे स्टेशन परिसरात पंचशील ध्वजा जवळ नाटकर यांचे मिञ विजय ससाळे यांचा वाढदिवस साजरा करत असतांना अचानक परतुर पोलीस निरीक्षक कौठाळे व पोलीस कॉन्स्टेबल संजय वैद्य आले त्यांनी सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली आम्हाला काय झाले काहीच समजले नाही सर्व पदाधिकारी पळायला लागले वाढ दिवसाकरिता आणलेला केक सुद्धा त्यांनी फेकून दिला. आम्ही कौठाळे यांना विचारले असता कौठाळे म्हणाले की, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करू शकत नाही मी तुमच्या सर्वांवर गुन्हा दाखल करू शकतो अशी धमकी सुद्धा पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी दिली. पुढे तक्रारीत असे आहे की, वास्तविक पाहता जिथे आम्ही नेहमीच वाढदिवस व सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतो पंचशील ध्वजा समोर ही जागा रेल्वे स्टेशन आरपीएफ कार्यालय व जीआरपी कार्यालयाच्या अगदी जवळ आहे त्यांना आज पर्यंत कधी आमच्या मुळे त्रास झाला नाही परंतु ता.१५ रोजी संध्याकाळी ७: ३० च्या सुमारास आलेले पोलीस निरीक्षक कौठाळे यांना नेमका काय त्रास झाला ? हेही आम्हाला समजले नाही किंवा नागरिकांचे आमच्या बाबत काही तक्रार होती का त्यामुळे अशा प्रकारे आमच्या पदाधिकाऱ्यांना अचानक हल्ला करून मारहाण केली? यांची चौकशी करावी व विनाकारण पदाधिकाऱ्यांना अपमानित करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा , कारण परतूर शहरात अनेक अवैध धंदे सुरू असताना त्यावर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करून प्रतिबंध करण्यास अपयशी ठरलेले पोलीस निरीक्षक कौठाळे मात्र निरापराध लोकांना मारहाण करतात पोलीस अधीक्षकांनी परतूर पोलीस निरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशाराही वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर यांनी जालना पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारारीत दिला आहे.