परतूर तालुका

चारित्र्याच्या संशावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून !

images (60)
images (60)

आरोपी स्वतः परतूर पोलीस ठाण्यात हजर

दीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क


परतूर शहरातील सावता नगर मध्ये भाडोञी घरात राहणा-या मिलिंद नारायण पाडेवार वय वर्ष २५ पत्नीसह भाड्याने दोन महिन्यापासून राहत होता. मिलिंद पाडेवार हा त्याची पत्नी प्रतीक्षा वय वर्ष २२ हिच्या चारित्र्या वर नेहमी संशय घेत होता. रविवारी दुपारी प्रतिक्षा फोनवर बोलत होती, मिलींद पाडेवार याने कोणताही विचार न करता प्रतिक्षा हिच्यावर डोक्यावर कुर्‍हाडीने ७ ते ८ वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मिलिंद पाडेवार रक्ताने माखलेल्या कुर्‍हाडीसह स्वतः परतूर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी परतुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. परतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!