परतूर तालुका

स्वार्थ व गर्वा पाई जिल्ह्यातील क्रिकेट खेळांडूंच भविष्य अंधारात.

दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
जालना जिल्ह्यातील विजय झोल, मिना गुरवे, आघाव आदी क्रिकेट खेळाडी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले असल्या मुळे क्रिकेट या खेळा कडे अनेक पालकांचा कल आहे.
या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील अनेक खेळाडू सद्या क्रिकेट चा सराव करताना दिसतात.
प्रत्येक पालक क्रिकेट शिकवण्या करिता अगदी मुलगा-मुलगी ५-६ वर्षाचे झाले की, आपल्या पाल्याला चांगला प्रशिक्षक शोधून क्रिकेट करिता ते सांगतील त्या महागातल्या महाग वस्तू घेतात. क्रिकेट चा सराव सुरू राहतो, दिवसेनं दिवस आपल्या पाल्यात सुधारणा पाहून पालक आनंदात असतात.
मुलगा १४ वर्षाचा होईपर्यंत प्रशिक्षकाची फिस जी १०-१२ हजार असते ती दर वर्षाला भरत असतात. परत दर रविवारी किंवा सुट्यांमध्ये मॅचेस असतात त्या सामण्यांची फिस भरतात. का तर आपला मुलगा-मुलगी ही भविष्यात महाराष्ट्र व नंतर भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या भाबड्या आशेपोटी हा सगळा खटाटोप सुरू असतो. मुलं मुली नियमित चांगले खेळले तर ते प्रतिनिधीत्व करतात.
पण गेली अनेक वर्षे जालना जिल्ह्यातील जालना क्रिकेट असोसिएशन हे ठरावीक लोकं चालवताना दिसते. त्यामुळे अंतर जिल्हा क्रिकेट सामने असो की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची १४,१६ किवा १९ वर्षाखालील निवड प्रक्रिया असो याची कुठेही जाहीरात दिली जात नाही. या उलट आपल्या मर्जीतील पालकांच्या मुलांना संधी देली जाते. एखादा खेळाडू चा असला तरी वाइट हेतू ने त्याला डावलले जाते. तसेच निवड प्रक्रियेच्या नावाखाली पालकांकडून अव्वाच्या-सव्वा पैसे वसुल केल्या जातात. पालकांना त्याची पावती दिली जात नाही. हा सर्व भोंगळा कारभार सुरू आहे.
म्हणून जालना जिल्ह्यातील ऊदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंचे भविष्य अंधारात राहू नेये या करिता
जालना क्रिकेट असोसिएशन च्या कारभाराची चौकशी व्हावी. या करिता परतूर येथे पत्रकार परिषद घेऊन शर्मा क्रिकेट असोसिएशन परतूर चे प्रशिक्षक संतोष शर्मा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

images (60)
images (60)

अनागोंदी कारभाराचे काही पुरावे हवे असतील तर ते मी पुढिल पत्रकार परिषदेमध्ये नावासह सादर करेल. — संतोष शर्मा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!