बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या युट्यूब चॅनल विरोधात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मंठा/प्रतिनिधी मानसिंह बोराडे :
मंठा येथील पत्रकारांची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी टाइम्स 24 या चॅनलचे संपादक राज यांच्यासह बातमी सोशल मीडियावर पोस्ट करणारा जीवन काळे यांच्याविरुद्ध मंठा पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 कलम 500 व 507 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तथाकथित टाइम्स 24 च्या संपादकाने मंठा येथील पत्रकार संतोष दायमा यांना मोबाईलवर संपर्क साधून तक्रार आल्याचे सांगितले. सदर प्रकरण मिटवायचे असेल तर मला बोला अन्यथा बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संतोष दायमा यांनी सदरील संपादकास दाद न दिल्याने टाइम्स 24 या चॅनलला बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केले तसेच जीवन काळे नावाच्या व्यक्तीने सदरील बदनामीकारक बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून संतोष दायमा यांच्या तक्रारीवरून मंठा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ढवळे व त्यांना सहाय्यक म्हणून दीपक आढे हे तपास करीत आहेत. संबंधितांविरुद्ध तक्रार देताना पत्रकार संतोष दायमा,बालाजी कुलकर्णी,नागेश कुलकर्णी, पंडितराव बोराडे,अनिल बा खंदारे,कृष्णा भावसार,राजेश भुतेकर,तुकाराम मुळे,रणजीत बोराडे,बाबासाहेब कुलकर्णी, शबाब बागवान,अतुल खरात, रवी भावसार आदींची उपस्थिती होती.