परतुर तालुका स्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

दीपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क
ता..११ रोजी आनंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परतुर येथे कॅरम क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आनंद शाळेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ कदम तसेच तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद राठोड तालुका क्रीडा सहाय्यक विकास काळे , तसेच ब्राईट स्टार शाळेचे क्रीडा शिक्षक गजानन कुकडे तसेच परतुर येथील वार्ताहर गणेश लालझरे पालक म्हणून उपस्थित असलेले राजेश रायमुळे राजेंद्र मस्के यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेसाठी निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. कॅरम क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे खालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आयुष भुरके द्वितीय क्रमांक पार्थ राजेश रायमुळे तृतीय क्रमांक युवराज गणेश लालझरे चतुर्थ क्रमांक सुजल काळे तर पाचवा क्रमांक साई अजय कांबळे यांनी पटकावला असून सर्व मुलांची जिल्हा स्तरीय खेळासाठी निवड झाली आहे १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक भेरजे सोहम द्वितीय क्रमांक तांगडे देवराज तृतीय क्रमांक कोटेच्या चिराग चतुर्थ क्रमांक अरीब खतीब तर पाचवा क्रमांक सोहम गिरी याने पटकावला असून सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सतरा वर्षा खालील मुलीं मध्ये प्रथम क्रमांक जानवी राजेंद्र मस्के द्वितीय क्रमांक हर्षदा चंदेल तृतीय क्रमांक संतोषी गणेश लालझरे तर चतुर्थ क्रमांक समृद्धी मोरे या विद्यार्थिनींनी पटकावला असून सर्व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल परतुर तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड क्रीडा सहाय्यक विकास काळे गजानन कुकडे व सर्व क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.