परतूर तालुक्यातील शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांमुळे मिळाला नवा श्वास

दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
तालुक्यातील डोल्हारा येथील दामोदर बापूराव काटकर यांना गेल्या काही दिवसां पासून फुफ्फुसाच्या आजारामुळे श्वसनाला अडचण येत असल्यामुळे खाजगी ईस्पितळात दरदिवशी बेडसाठी २०० रु रोज, नर्सिंग चार्ज ५०० रु आणि ऑक्सिजन साठी १००० रुपये असा किमान खर्च सुरू होता. परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आजोबांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय कुटूंबीय करत होते. घरी जर ऑक्सिजन मिळाला तर बाबांना श्वास घ्यायला अडचण येणार नाही असा डॉक्टरांनी सल्ला देऊन त्यांना घरी पाठवले. घरी येताच बाबांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ही माहिती गणेश सुरासे यांच्याकडून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे यांना समजताच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या वतीने मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटेर मशीनपैकी एक मशीन बाबांना देण्याचा निर्णय घेतला व त्याना घरपोच मशीन दिले. मशीन सुरू होऊन ऑक्सिजन नाकावाटे फुफूसात जाताच बाबांना नवा श्वास मिळाला. त्यांच्या तडफड काही क्षणात कमी झाली. अस्तव्यस्त झालेले बाबा परत बोलू लागले. बाबांनी व त्यांच्या कुटूंबीयानी दादासाहेब थेटे, मंगेश चिवटे सर व त्यांच्या शिवसेना वैद्यकीय कक्ष मराठवाडा टीमचे मनापासून आभार मानले. या मदतीमुळे या शेतकरी कुटूंबियांचा खूप मोठा खर्च टळला असून त्यांना घरीच उपचार घेणे शक्य झाले आहे. मिळालेल्या मदतीसाठी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, डॉ श्रीकांत शिंदे ,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, मंगेशजी चिवटे जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल व शिवसेना वैद्यकीय कक्ष मराठवाडा टीमचे आभार मानले. तसेच परतूर तालुक्यातील वैद्यकीय मदती करीता परतूर विधान सभा कक्ष प्रमुख शिवाजी तरवटे मो.न. ८६५७२५५५५१ व सह तालुका प्रमुख दत्ता अंभूरे मो.न.९४२१११ ४६६१ सांच्याशी संपर्क करा.असे दत्ता आंभूरे यांनी कळविले आहे.