उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग शेतकर्यांचे उपोषण !
दीपक हिवाळे/परतूर न्युज नेटवर्क
न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने इमारतीच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाल्याने शेतकर्यांनी नुकस्न भरपाई मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. परतूर शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने इमारतीच्या संरक्षक भिंतीचे काम करतांना योग्य तो भराव भरला नाही. संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पावसाचे पाणी शेतकरी अंकुश खालापुरे यांच्या शेतात साचुन तीन एकर कापसाचे नुकसान झाले आहे. न्यायालय इमारतीचे काम करणाऱ्या सुनील इंटरप्रायजेस कंत्राटदाराने इमारतीच्या आवारात साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था न केल्याने दिव्याग शेतकऱ्याच्या तीन एकरातील कापूस पिकात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. प्रशासनाकडे झालेल्या नुकसानीची अनेक दिवसापासून तक्रार करूनही दखल न घेतल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त करून यांची नुकसान भरपाई देण्यात यावी व कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी करून दिव्यांग शेतकरी अंकुश खालापुरे, दत्ता खालापुरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.