सकल मराठा समाजाच्या बंदला मंठा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
सकल मराठा समाजाच्या बंदला मंठा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
मंठा प्रतिनिधी/ मानसिंह बोराडे:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्य यांच्या विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून जालना जिल्हा बंद च्या धरतीवर सकल मराठा समाजाच्या वतीने मंठा तालुका बंदचे आव्हान करण्यात आले होते . या बंदला मंठा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला
आज सकाळी छत्रपती संभाजी राजे चौक (मंठा फाटा) येथून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली .राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हटाव असे नारे देण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या निषेध रॅलीला अनेक मान्यवरांनी संबोधित केले. त्यात मराठा सेवा संघ परतूरचे तालुकाप्रमुख प्रा. संभाजी तिडके यांनी या रॅलीला संबोधित करताना सांगितले की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व फुले दांपत्ये यांच्या विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेध म्हणून ही रॅली काढण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक दहशतवाद पसरवत आहेत असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अशोक नाना वायाळ यांनी राज्यपाल व जे कोणी महापुरुषांचा आवमान करीत आहेत त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे सांगितले त्यानंतर अण्णासाहेब खंदारे यांनी आपले मत व्यक्त करताना राज्यपालाचा खरपूस समाचार घेतला .त्यानंतर जालना शिव सेना जिल्हाप्रमुख ए .जे. पाटील बोराडे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी या आधी बऱ्याच वेळा महापुरुषांचा आवमान केला आहे त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही तो पर्यंत जालना जिल्ह्यामध्ये आंदोलने थांबणार नाहीत असे सांगून त्यांनी सर्व समाजाचे आभार व्यक्त केले या बंदला मंठा तालुक्यातील सर्व संघटनांनी व समाजातल्या सर्व घटकांनी आपला पाठिंबा पत्र देऊन व्यक्त केला होता .त्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा ,समस्त मुस्लिम समाज ,एम ,आय, एम ,पक्ष टिपू सुलतान युवा मंच, जय भीम सेना, सारनाथ युथ ग्रुप ,नाभिक महामंडळ मंठा,व्यापारी असोसिएशन मंठा तालुका ,समता परिषद, नॅशनल काँग्रेस वफ्फ कमिटी ,भीमशक्ती संघटना जालना ,जय मल्हार संघटना मंठा ,मुस्लिम कमिटीचे लाला खासाब व त्यांची संघटना व सर्व मुस्लिम समाज, सर्व व्यापारी, पत्रकार बंधू ,पोलीस मित्र व समाजातील सर्व समाज बांधव यांनी मंठा बंदला उस्फुर्त पाठिंबा देऊन मंठा तालुका बंद यशस्वी केला व मंठा तालुक्याचे तहसीलदार यांना राज्यपाल हटाव चे निवेदन देण्यात आले व निषेध रॅली कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ काकडे यांनी केले व मंठा बंद यशस्वीतेसाठी समाजातल्या सर्व तरुण व सर्व पक्षातल्या नेते मंडळींनी सहकार्य केले.