मंठा तालुका
रिया राठोड ची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड.
मंठा : मानसिंह बोराडे
जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटांमध्ये आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शेवगाव येथील विद्यार्थिनी कुमारी राठोड रिया रमेश सावंगीकर ही जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये विजयी झाली आसुन तिची सोलापूर येथे होणाऱ्या शालेय पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत विक्रम घुटे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिला ह्या निवडी बद्दल प.पु योगानंद बापू,आजोबा रावसु राठोड मा.समाज कल्याण निरिक्षक,सुदाम राठोड मा.उपशिक्षणाधिकारी,जगदीश राठोड संचालक नेत्रा ग्रुप ,तसेच खोराड सावंगी येथील गावकर्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.