नगरसेवक कृष्णा आरगडे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान !

दीपक हिवाळे/परतूर न्युज नेटवर्क
अतिशय मनाचा आणि प्रतिष्ठेचा समाजला जाणारा जालना जिल्हा समाज भूषण पुरस्कार धोबी परीट समाजाचे कार्यकर्ते परतूर येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कृष्ण आरगडे यांना जालना येथे प्रदान करण्यात आला
यावेळी बोलताना कृष्णा आरगडे यांनी आपल्यावर समाजाचे ऋण असून समाजाचे उत्तरदायित्व निभवण्यासाठी आपण सदैव समाजसेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजाच्या सेवेत सदैव असून समाजकार्य करण्यासाठी मला केव्हाही हाक द्या मी साथ देण्यासाठी तयार असल्याचे धोबी परीट समाजाचे युवा कार्यकर्ते कृष्णा आरगडे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले की संत गाडगेबाबांनी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात मला जन्म मिळाला याचा मला सार्थ अभिमान असून जनकल्यासाठी मला जे जे करता येईल त्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
सदैव समाजाच्या ऋणात राहील समाजकार्यासाठी नियमितपणे हाक द्या मी साथ देईल – कृष्णा अरगडे