रोहिना शिवारातील पाच एकर उस जाळला, एका विरुद्ध गुन्हा दाखल
दहा लाख रुपयाचे नुकसान
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
तालुक्यातील रोहिना खुर्द येथे शेतकर्यांचा गावातील व्यक्तीने पाच एकर ऊसाला आग लावून दहा लाख रुपयाचे नुकसान केल्याने परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत शेतकरी रामेश्वर उद्धव खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. ९ जानेवारी २०२३ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन परतुर येथुन झालेल्या भांडनाची तक्रार देवुन घरी रोहिणा खुर्द येथे जात असतांना आमच्या रोहिणा शिवरातील गट नं १२६ मधील ऊसाच्या शेतात आग लागलेली दिसली शेताकडे जावुन पाहिले असता गावातील देवराव निवृत्ती खोसे हा शेतात आग लावतांना दिसला. त्याला थांब थांब म्हणून अशी हाक मारली असता देवराव निवृत्ती खोसे हा आग लावून पाहुन पळुन गेला. या आग लागलेल्या गावातील लोकांना फोन करुन शेतात आग लागल्याची माहिती दिली आग विझवीण्याचा खुप प्रयत्न केला परंतु आग पुर्ण शेतात लागल्याने सात एकर ऊसा पैकी पाच एकर मधील ऊस आगीने जळुन खाक झाला आहे. आठ ते दहा लाख रुपयाचे नुकसान केले. या प्रकरणी रामेश्वर खोसे यांच्या फिर्यादीवरुण देवराव निवृत्ती खोसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक इस्माईल शेख हे करीत आहेत.