परतुर रेल्वे गेट उड्डान पुलाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या – परतूरात सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतुर रेल्वे गेटवर नव्याने होत असलेल्या उडान पुलाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे असे निवेदन परतूर येथील उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद परतुर यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान असून महाराष्ट्रातून मुंबई गुजरात कडे जाऊ नये यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. तसेच देशाच्या बाहेर रशियामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शिवरायांचे गुण गाऊन रशियात मराठी अस्मिता वाढविली..कथा, कादंबऱ्या, कविता, पोवाडे असे विविध प्रकारचे साहित्य लिहून महाराष्ट्राचा गौरव व मान वाढविला आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या त्यागाचे व समाज हिताचे कामाची प्रेरणा भावी पिढीला मिळावी म्हणून रेल्वे गेटवर होत असलेल्या उडान पुलाला महापुरुष लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे असे निवेदन मा. नगरसेवक रामचंद्र पानवाले ,अशोक पुरळे, सुरेश हिवाळे, रमेश हिवाळे, दिनेश हिवाळे, दगडूबा घोडे ,उमेश लोखंडे, अनिल पांजगे, कृष्णा कापसे व संतोष खनपटे यांनी दिले आहे.