परतूर तालुका

सुपरफास्ट ट्रेन सचखंड, नरसापूर एक्सप्रेस परतूरला थांबणार !

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

सुपरफास्ट ट्रेन सचखंड, नरसापूरला परतूर स्थानकावर थांबा मिळाला पाहिजे म्हणुन डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी सर्व नागरिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री, रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन दिले होते. त्यासोबतच परतूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस चौकी असूनही चेन स्नॅकिंग आणि दोन्ही फलाटांवर सुरक्षा भिंत नसल्याने असुरक्षित वाटत आहे. रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय सुरू करण्याबरोबरच दोन नंबर फलाटांवर डिस्प्ले बसवणे आवश्यक आहे या मागण्यांचा सुद्धा समावेश होता. डॉ. मंत्री यांच्या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून दाखल, सुपरफास्ट ट्रेन सचखंड, नरसापूरला परतूर स्थानकावर थांबा आणि सुरक्षाविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी रेल्वे बोर्डाला निर्देश दिले आहेत. याबद्दल डॉ. मंत्री आणि सर्व नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!