रांजणी येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न
न्यूज जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली.येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती शांततेत साजरी करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आयोजित बैठकीत बोलताना केले.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमोल देशमुख यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शेख रहीम हे उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक महाजन बोलताना म्हणाले की रांजणी या गावाची शांतता प्रिय गाव म्हणून सर्वत्र ओळख आहे.यापुढेही ही ओळख कायम ठेवून शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रा.पं.सदस्य कैलास वरखडे,धनंजय देशमुख,सय्यद अन्सार अली,विठ्ठल देशमुख,संतोष कुहिरे,शेख इरफान,सोपान देशमुख, बंडू गाढे,गोपीनीय शाखेचे पोहेका आत्माराम घुले,संजय जाधव,शफिक अत्तार,सय्यद इलियास यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.