कुलदीप पवार आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
गुप्तेश्वर चॅरीस्ट्रेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर
कुंभार पिंपळगाव:प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण – भेंडाळा शिवारातील श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने रूद्र महायज्ञ करण्यात आला.या दिवशी दिवसभर भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल होती.यानिमित्ताने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अकरा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सहशिक्षक राजू विजय छल्लारे,कुंभार पिंपळगाव येथील पत्रकार कुलदीप पवार यांना घनसावंगी येथील श्रीक्षेत्र गुप्तेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल तसेच कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल समाजसेवक म्हणून सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ह.भ.प.निवृत्ती महाराज घुमरे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.तसेच डॉ.पी.डी.लहाने,मनमंदिरचे संचालक माधव पवार,सहारा अनाथालयाचे संचालक संतोष गर्जे,इंफट इंडियाचे संचालक दत्ताभाऊ बारगजे,प्रवाहचे संचालक रामेश्वर गोर्डे,आदर्श शिक्षक दत्ता यशवंते,गुणवंत विद्यार्थी भरत सुरासे,पोलीस अधिकारी योगेश गायके,युवा उद्योजक गजानन गोरे,पत्रकार कुलदीप पवार या सर्वांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीक्षेत्र गुप्तेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट,भेंडाळाचे अध्यक्ष तात्या महाराज सुरासे,भगवान श्रीपाद साबळे,सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया,उपसरपंच आबासाहेब राऊत,पत्रकार लक्ष्मण बिलोरे ,किशोर शिंदे,भागवत बोटे,अजय गाढे,पद्माकर आधुडे,सुरेश कंटुले,बाळासाहेब सुरासे,जनता अर्बनचे अध्यक्ष प्रकाश कंटुले,प्रा.शाम चमचे,परमेश्वर सुरासे यांच्यासह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.