घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा, प्रत्येक गावात युवकासाठी ग्रंथालय सुरू करावे,शेततळे सिंचन योजना सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी घनसावंगीचे तहसीलदार यांच्याकडे सोमवारी (ता.२७) युवा क्रांती एकता संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनावर युवा क्रांती एकता संघाचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, तालुकाध्यक्ष दिपक साबळे,अनिल चव्हाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.