घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
भेंडाळा येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी गुलाब चव्हाण यांची निवड
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब लालू चव्हाण तर उपाध्यक्षपदी नामदेव अश्रूबा शिंदे यांची शनिवारी (ता.२०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.संचालक मंडळात सदस्य म्हणून मारोती शिंदे,धर्मराज चव्हाण,विठ्ठल राठोड,गणेश सुराशे,भिमराव खडेकर,पंडित सुराशे,बबनराव सुराशे,प्रकाश सुराशे,अनिता जाधव,सुनीता सुराशे,यांचा समावेश आहे.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी गटसचिव खरात,सरपंच चत्रभूज मुन्ने,संपत सुराशे,डॉ.बबनराव खडेकर,प्रकाश सुराशे,अर्जुन शिंदे,बाळू सुराशे,बाबुराव राठोड,राधेश्याम चव्हाण,अनिल राठोड,प्रेम चव्हाण,बाबासाहेब राठोड,विलास चव्हाण यांची उपस्थिती होती.