सिध्दार्थ पानवाले यांचे सेट परिक्षेत यश
दीपक हिवाळे /परतुर न्युज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा तर्फे 26 मार्च 2023 रोजी घेतलेली प्राध्यापक पात्रता परिक्षा अर्थात SET या परिक्षेचा नुकताच दि.२७ जुन रोजी निकाल लागला.पुणे विद्यापिठाने दिलेल्या माहिती नुसार सदर परिक्षेत महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातुन तब्बल १ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी ३२ वेगवेगळ्या विषयांत परिक्षा दिली होती.या परिक्षेचा निकाल एकुण संख्येच्या केवळ ६% असा फार कमी लागतो.या राज्यस्तरीय परिक्षेत परतुर येथील सिध्दार्थ पानवाले यांनी दुसर्यांदा घवघवीत यश मिळविले आहे.याअगोदर 2021 मध्ये इंग्रजी विषयातुन तर यावर्षी इतिहास विषयातुन चांगले गुणांकन मिळाले आहे.या यशाबद्दल भंते उपगुप्त महाथेरो पुर्णा,संबोधी अकादमी चे भिमराव हत्तीअंबीरे,मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख कपीलभैया आकात,कुणाल दादा आकात,ला.ब.शा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खंदारे,डॉ.संजय पुरी,एकनाथ कदम,माजी सभापती सुशिलाताई बाळासाहेब अंभिरे,माजी नगरसेवक विजय राखे,मास्टर अनिल कांबळे,अजित पोरवाल, नगरसेवक निखील पगारे जालना,सामाजिक कार्यकर्ता सिध्दार्थ इंगळे,श्रीकांत वाघमारे,रमेश साळवे,महेंद्र बनकर,मंठा नगरसेवक अरुण वाघमारे,ॲड.तथागत पाईकराव,ॲड नितीन मस्के,अझर काझी,वसीम सय्यद,मारोती घोरबांड या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.