परतूर तालुका
मुरलीधर राऊत वाहतूक नियंत्रक पदावरून सेवानिवृत्त
राऊत हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना विभागातील परतूर आगाराचे वाहतूक नियंत्रक होते.
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर आगारातील मुरलीधर राऊत हे १९८९ ला परतूर आगारात वाहक म्हनुन रूजू झाले. २००९ ते २०१० एक वर्ष अंबड आगारात, ६ महीने जाफ्राबाद आगारात, व तब्बल ३२ वर्षे परतूर आगारात वाहतूक नियंत्रक म्हनुन सेवा दिली. व दि. ३० जून २०२३ रोजी ३४ वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास विभाग नियंत्रक जालना जिल्हा मेहूल ,विभागीय वाहतूक अधिकारी जालना जिल्हा जाधव परतूर आगार प्रमुख वागदरीकर ,परतूर आगार वाहतूक निरिक्षक राठोड , वा. नि. साळवे मॅडम यांच्यासह परतूर आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय सहकारी तसेच मित्र परिवार ऊपस्थित होते.