ढगफुटी सादृश्य पाऊस; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथे नदीला पूर आल्याने गावात शिरले पाणी
ढगफुटी सादृश्य पाऊस; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथे नदीला पूर आल्याने गावात शिरले पाणी
जालना : मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथे एक सप्टेंबर रोजी सकाळी तीन वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. बारा तास उलटून गेले तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. ढगफुटी सादृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांवर पाणी फिरले आहे. आणखी काही तास असाच पाऊस चालू राहिल्यास गावाजवळीलपाझर तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा वर्षात असा पाऊस झालानाही असे ग्रामस्थांनी सांगितले. बातमी हाती येईपर्यंत मंठा तालुक्यातील प्रशासन मात्र अजूनही गावापर्यंत पोहोचले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे गावातील मातीची घरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही ग्रामस्थांनी सांगितले. हाती आलेल्या माहिती नुसार आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांवर मात्र पाणी फिरले आहे.