अंबड तालुका

शिक्षण महर्षी कै.पंढरीनाथ शिसोदे यांच्या पुण्यतिथीनिमित्तवडीगोद्रीत १३८ रक्तदात्यांचे रक्तदान.


:अंबड :तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर या शाळेत विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक शिक्षण महर्षी कै.पंढरीनाथ पाटील शिसोदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतावादी कार्यास हातभार लावला आहे.

images (60)
images (60)

या शिबिरात प्रारंभी कै.पंढरीनाथ पाटील शिसोदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कै.पंढरीनाथ शिसोदे यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान करून कृतीयुक्त पुण्यतिथी साजरी केली.या शाळेत शिक्षण घेतलेल्या पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी रक्तदान करून हा स्तुत्य उपक्रम राबविला.या सामाजिक कामासाठी परिसरातील तरूणांनी सामाजिक बांधिलकी समजून रक्तदान करून गरजूंना जीवन दान देण्याच्या उद्देशाने रक्तदानाचे काम केले.या रक्तदान शिबिराचे संयोजन सहशिक्षक आर.व्ही.छल्लारे यांनी केले होते.

सध्या विविध शस्रक्रिया,कर्करोग,थँलसेलिया अशा विविध आजारावरील उपचारांमध्ये रक्ताची मोठी गरज भासत आहे.यावेळी दत्ताजी भाले रक्तकेंद्र यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.याला युवक व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरास शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,तरुण,पंचक्रोशीतील गावकरी,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली महत्वपूर्ण सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी प्राचार्य आर.के.माळी,पर्यवेक्षक जे. डब्ल्यू.दांडगे,मुंढे सर,जी.आर.गावडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी,पंचकृषीतील समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्यावतीने रक्तदात्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या रक्तपेढीचे वरिष्ठ तंत्रज्ञ अजित काळे,तंत्रज्ञ वामन कांबळे,जनसंपर्क अधिकारी कृष्णा कुलकर्णी,असिस्टंट
राधा पठाडे,नर्स आशा आगलावे,सुनिता पगारे,सहाय्यक सखुबाई जाधव,चालक
गणेश देवाडिगा यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!