घनसावंगी तालुक्यात विना नंबर वाहनांवर RTO ची विशेष कारवाई

अंबड-
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) जालना यांच्या वायूवेग पथकाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात विना नंबर हायवा व टिप्पर वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली.आहे
ही कारवाई जिल्हाधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत एकूण 51 अवैध वाहनांवर मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत
सात लाख ९४ हजार पाचशे दंड ठोठावण्यात आला, त्यापैकी ₹चार लाख ८४ हजार पाचशे चा दंड वसूल करण्यात आला.
ही विशेष मोहीम मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे व संजीवनी चोपडे तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण केदारे, संदीप लगसकर आणि अमोल राठोड यांच्या पथकाने राबवली.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार
RTO जालना कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, विना नंबर अवैध वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यातही अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असून, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर आणि मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल.