बदनापूर तालुका

धोपटेश्वरच्या संदीप दाभाडेंचा दिल्लीत राष्ट्रीय सन्मान!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘JRD TATA AWARDS 2026’ पुरस्काराने गौरव; ७५ हजारांचा धनादेश प्रदान

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

नवनाथ गव्हाणे /बदनापुर प्रतिनिधी

बदनापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी धोपटेश्वर येथील युवा उद्योजक संदीप दाभाडे यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित प्रतिष्ठित ‘JRD TATA AWARDS 2026’ या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘Entrepreneur of the Year Award – Second Runner-up’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, पुरस्कारासोबत ७५ हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

‘Celebrating Gramppreneurs, Growing India’ या संकल्पनेवर आधारित या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील ग्रामीण उद्योजकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात संदीप दाभाडे यांनी मिळविलेला सन्मान हा त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.

संदीप दाभाडे यांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीत BYST संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्थेमार्फत मिळालेले मार्गदर्शन, अनुभवी मेंटॉरचे सहकार्य आणि व्यवसायवृद्धीसाठी मिळालेली योग्य दिशा यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळाली. जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागातून थेट राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.

या यशामागे मार्गदर्शक, BYST परिवार, कुटुंबीय, सहकारी आणि विश्वासाने साथ देणाऱ्या सर्वांचे मोलाचे योगदान असल्याची भावना संदीप दाभाडे यांनी व्यक्त केली.

धोपटेश्वरसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या उद्योजकाने राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण बदनापूर तालुक्याची अभिमानास्पद बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील नवउद्योजकांना नवी प्रेरणा मिळणार असून, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर गावखेड्यातूनही राष्ट्रीय स्तरावर यशाची भरारी घेता येते, हे संदीप दाभाडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे.

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,145
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!