जालना क्राईमजालना जिल्हा

तालुका जालना पोलिसांच्या जीपला भरधाव स्कार्पिओ जीपची धडक

पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी


न्यूज जालना ब्युरो दि२९

images (60)
images (60)

जालना शहरापासून जवळच असलेले सिंदखेडराजा रोडवर दत्तआश्रमाजवळ रात्री 8.30 वाजता घडला तिहेरी अपघात जालना तालुका पोलीस गाडीला अपघात होऊन काही पोलीस जखमी झाली आहे सदर्भित घटना ही सोमवारी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली आहे
सविस्तर वृत्त असे की
,तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास काकडे हे पोलीस कर्मचारी उगले, दिगंबर चौरे आणि चालक नागरे यांच्यासह जालना शहरकडून सिंदखेडराजा रोडकडे पेट्रोलिंग करीत निघाले होते. त्यादरम्यान, सिंदखेडराजाकडून येणाऱ्या एका भरधाव स्कॉर्पिओ जीपने समोर असलेल्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर ही जीप विरोधी दिशेला असलेल्या पोलिसांच्या जीपवर जाऊन धडकली. या तिहेरी अपघातात पोलीस जिपसह दुचाकी व स्कॉर्पिओचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोना. उगले, पोकाँ. दिगंबर चौरे व चालक नागरे हे जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक काकडे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्कॉर्पिओमधील काही प्रवाशी व दुचाकीस्वार हेही जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!