जालना जिल्हा

सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रभावी सादरीकरण; ‘कारखाना’ नाटकाने ऊसतोड कामगारांचे वास्तव जिवंत केले.

किशोर मोरे / घनसावंगी प्रतिनिधी

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना


सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२६अंतर्गत सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना यांनी ‘कारखाना’ या सामाजिक आशयघन नाटकाचे प्रभावी आणि यशस्वी सादरीकरण करून प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

लेखक नंदू वाघमारे लिखित या नाटकातून ऊसतोड कामगारांच्या जीवनातील संघर्ष, वेदना आणि सामाजिक वास्तव अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर उभे करण्यात आले आहे. ऊसाच्या पाचटात राहूनही शिक्षणाच्या बळावर गरीब कुटुंबातील विद्यार्थी UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजात परिवर्तन घडवू शकतो, असा आशावादी आणि प्रेरणादायी संदेश लेखकाने नाटकातून दिला आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन नारायण पवार यांनी समर्थपणे केले असून त्यांनी प्रत्येक प्रसंगाला वास्तवदर्शी आणि भावस्पर्शी रूप दिले आहे. कलाकारांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. रोशनी वाघमारे, हर्षदा मंगलगी, प्रीती कदम, रामा पाडोळे, केशव पाटील, लक्ष्मण काळे, सूरज जैन आणि नंदू वाघमारे यांनी आपल्या दमदार भूमिकांमधून नाटकाचा आशय प्रभावीपणे साकारला.

नाटकाची प्रकाश योजना – बाळू बटुळे, संगीत संयोजन – नारायण पवार, नेपथ्य – विशाल झीने, रंगभूषा – ज्योती काळे, वेशभूषा – मनोज चव्हाण व रूपाली अल्हाट यांनी सांभाळली. तसेच रंगमंचीय व्यवस्थापनाची जबाबदारी हरिदास घुंगासे, रघुनाथ ताठे, किसन भोईटे, मनीषा घुंगासे, सरिता बलैया आणि कृष्ण हरदास यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या नाटकाची निर्मिती हरिदास घुंगासे यांनी केली असून त्यांच्या निर्मितीला सर्व स्तरांतून भरभरून दाद मिळत आहे.

या नाट्यप्रयोगासाठी प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक-दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे तसेच डॉ. राजू सोनवणे यांचे  मार्गदर्शन लाभले.  ‘कारखाना’ हा प्रयोग सामाजिक आशय, प्रभावी मांडणी आणि दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,129
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रभावी सादरीकरण; ‘कारखाना’ नाटकाने ऊसतोड कामगारांचे वास्तव जिवंत केले.

किशोर मोरे / घनसावंगी प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२६अंतर्गत सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना यांनी 'कारखाना' या सामाजिक आशयघन नाटकाचे प्रभावी आणि यशस्वी सादरीकरण करून प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

लेखक नंदू वाघमारे लिखित या नाटकातून ऊसतोड कामगारांच्या जीवनातील संघर्ष, वेदना आणि सामाजिक वास्तव अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर उभे करण्यात आले आहे. ऊसाच्या पाचटात राहूनही शिक्षणाच्या बळावर गरीब कुटुंबातील विद्यार्थी UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजात परिवर्तन घडवू शकतो, असा आशावादी आणि प्रेरणादायी संदेश लेखकाने नाटकातून दिला आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन नारायण पवार यांनी समर्थपणे केले असून त्यांनी प्रत्येक प्रसंगाला वास्तवदर्शी आणि भावस्पर्शी रूप दिले आहे. कलाकारांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. रोशनी वाघमारे, हर्षदा मंगलगी, प्रीती कदम, रामा पाडोळे, केशव पाटील, लक्ष्मण काळे, सूरज जैन आणि नंदू वाघमारे यांनी आपल्या दमदार भूमिकांमधून नाटकाचा आशय प्रभावीपणे साकारला.

नाटकाची प्रकाश योजना – बाळू बटुळे, संगीत संयोजन – नारायण पवार, नेपथ्य – विशाल झीने, रंगभूषा – ज्योती काळे, वेशभूषा – मनोज चव्हाण व रूपाली अल्हाट यांनी सांभाळली. तसेच रंगमंचीय व्यवस्थापनाची जबाबदारी हरिदास घुंगासे, रघुनाथ ताठे, किसन भोईटे, मनीषा घुंगासे, सरिता बलैया आणि कृष्ण हरदास यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या नाटकाची निर्मिती हरिदास घुंगासे यांनी केली असून त्यांच्या निर्मितीला सर्व स्तरांतून भरभरून दाद मिळत आहे.

या नाट्यप्रयोगासाठी प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक-दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे तसेच डॉ. राजू सोनवणे यांचे  मार्गदर्शन लाभले.  'कारखाना' हा प्रयोग सामाजिक आशय, प्रभावी मांडणी आणि दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!