कोरोना: कुंभार पिंपळगाव कडकडीत बंद
शुकशुकाट….,कोरोनामुळे कुंभार पिंपळगावात तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे.पहिल्याच दिवशी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे.या गावात परीसरातील चाळीस गावातील नागरीकांचा संबंध येतो. येथे नेहमीच वर्दळ असते. गाव व परीसरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे.प्रशासनाकडून दिलेल्या नियम व सुचनांचे नागरीकांनी पालन केले नाही.त्यामुळे कुंभार पिंपळगाव व परीसरात रूग्ण संख्या वाढत गेली.पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता.२) रोजी व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदवला.याला उत्सूर्फपणे मोठा प्रतिसाद मिळाला.दवाखाने व मेडीकल वगळता इतर सर्व दुकानदारांनी आपआपली आस्थापने बंद ठेवली.नागरीकांनी घरा बाहेर जाणे टाळले.येथील अंबड पाथरी मुख्य रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.मात्र दिवसभर या रस्त्यावर व गावात शुकशुकाट पाहायला मिळाला.दरम्यान येथील पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.