घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई !

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव बाजारपेठेत दि.३१ मार्च बुधवार रोजी विनामास्क फिरणाऱ्या वाहनधाराकांसह नागरिकांवर पोलिस व ग्रामपंचायत पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांवर प्रत्येकी दोनशे रूपये दंड वसूल करण्यात आले.
कुंभार पिंपळगाव गावात दिवसेंदिवस कोरोणा रुग्ण संख्येत वाढ होत आहे.बेजबाबदार नागरिक हे विनामास्क फिरताना आढळत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर सकाळपासून येथील महाराणा प्रताप चौक,शिवाजी महाराज स्मारक, बाजार समिती प्रांगणात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत चे अनवर पठाण, नानासाहेब कंटुले,कारकून अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवसींग बहूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रामदास केंद्रे यांच्या सह इतर पोलीस व कर्मचारी उपस्थित होते.

‘नागरीकांंनी नियमितपणे मास्क लावणे,सनिटायझर्स वापरणे, सुरक्षित अंतर राखणे,या त्रिसुत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करुन काळजी घेणे गरजेचे आहे.मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”

शिवसिंग बहूरे
पोलीस उपनिरीक्षक कुंभार पिंपळगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!