कुंभार पिंपळगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतच धरणे आंदोलन !
कुंभार पिंपळगाव :
जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खातेदार व कर्जदार यांच्या विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवारी बँकेतच फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलय.
शाखा कुंभार पिंपळगाव शाखा व्यवस्थापक मार्फत महाव्यवस्थापक विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव येथे कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने करण्यात यावे याचा नाहक त्रास खातेदारांना सोसावा लागत असुन शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ या शाखेत योग्य वेळेत मिळत नाही तसेच खात्यात रक्कम शिल्लक असुन देखील केवळ केवायसी नसल्याने मिळत नाही.
शाखेत कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने होण्यासाठी आदेश देण्यात यासह विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवार रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत धरणे आंदोलन केले आहे या शाखेत व बॅंकेच्या गेट व पायरी वर बसुन हातात मागणी चे फलक ( बोर्ड) घेवून जोर जोरात मागणीची घोषणा देण्यात आल्या यावेळी ग्राम विकास युवा मंच चे पदाधिकारी, खातेदार, कर्जदार मोठया संख्येने उपस्थिती होते.