वडीरामसगावामध्ये ८२ हजारांची घरफोडी

वडीरामसगावामध्ये ८२ हजारांची घरफोडी
घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८२ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजता घडली असून, या प्रकरणात तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडीरामसगाव येथील सोनाजी मच्छिंद्र शिंदे यांच्या मुलाचे घर शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घरातील३० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ४० हजार रुपये किमतीचे झुंबर, १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील वेल जोड, दोन हजारांचा पितळेचा हंडा, एक घागर, एक बकेट, असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात सोनाजी शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात घरफोडीचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत तिर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती 22 सप्टेंबर 2024 वार रविवारी सकाळी 10 वाजता तिर्थपुरी पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी दिली आहे